मुंबई पोलिस भरती लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर l Mumbai Police Bharti Written Exam Date 2024

Mumbai Police Bharti Written Exam Date 2024: मित्रांनो मुंबई पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दिनांक 11 जानेवारी 2025 आणि 12 जानेवारी 2025 या दिवशी पोलीस शिपाई आणि चालक या पदांचे पेपर घेण्यात येणार आहेत.

लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाचे सूचना आहे. बऱ्याच दिवसांपासून उमेदवारांचे लक्ष पेपर कधी होणार याकडे लागले होते आता उमेदवारांचे प्रतीक्षा संपली आहे कारण पोलीस डिपार्टमेंट मार्फत मुंबई पोलीस भरतीच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

मुंबईमधील रिक्त असणारे पोलीस शिपाई आणि पोलीस चालक पदांची भरती करण्याकरिता हे परीक्षा घेण्यात येणार आहे. जे उमेदवार पोलीस भरती मैदानी चाचणीमध्ये पास झाले होते त्यांना सदर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

मुंबई पोलिस भरती हॉल तिकीट उपलब्ध

मुंबई पोलीस भरती परीक्षा तारखा: Mumbai Police Bharti Written Exam Date 2024

विभागपोलिस विभाग
पद शिपाई, चालक
पात्रता12वी
नोकरी ठिकाणमुंबई
लेख प्रकारExam Date
परीक्षा तारीख11 व 12 जानेवारी 2025