Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५ सुवर्णसंधी नोकरीची!

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. २००८ नन्तरची हि सर्वात मोठी भरती आहे. तब्बल ६२० पदांसाठी हि भरती होणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. चला तर मग, या भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025 कोणत्या पदांसाठी भरती आहे?

या भरती प्रक्रियेत गट-क आणि गट-ड मधील एकूण ६२० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. काही महत्त्वाची पदे पुढीलप्रमाणे:

  • अभियंता पदे: बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल)
  • आरोग्य क्षेत्रातील पदे: स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सहाय्यक (महिला), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)
  • तांत्रिक पदे: वायरमन, ई.सी.जी. तंत्रज्ञ, सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ
  • इतर पदे: सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, कक्षसेवक (वॉर्डबॉय), कक्षसेविका/आया

वरील पदांव्यतिरिक्त आणखी काही पदांसाठीही अर्ज स्वीकारले जात आहेत.

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.nmmc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी:

माहितीची शुद्धता: अर्जातील माहिती अचूक आणि संपूर्ण असावी.

कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.

फीस भरणे: अर्ज करताना ऑनलाइन शुल्क भरावे.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: २८ मार्च २०२५
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ मे २०२५ (रात्री ११.५५ वाजेपर्यंत)
  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत: ११ मे २०२५
  • प्रवेशपत्र उपलब्ध होईल: परीक्षेच्या ७ दिवस आधी
  • लेखी परीक्षा: प्रवेशपत्रात नमूद केल्याप्रमाणे

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदवी आणि अनुभव आवश्यक आहे, तर काहींसाठी बारावी किंवा तत्सम पात्रता पुरेशी आहे. उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात नीट वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावा.

निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी

तयारी कशी करावी?

भरती परीक्षेसाठी उमेदवारांनी पूर्वतयारी करावी. संबंधित पदांच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून नियमित सराव करावा. मागील भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासाव्यात.

तयारीसाठी आवश्यक पुस्तकेCheck Out On Amazon