BMC City Engineer Recruitment 2024: मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निघालेले जुनिअर इंजिनियर भरती साठी इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवार सुद्धा आता अर्ज सादर करू शकतात. यापूर्वी फक्त डिप्लोमा धारक उमेदवार अर्ज सादर करण्यास पात्र होते.
मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता इंजीनियरिंग पदवीधर उमेदवारांनाही अर्ज सादर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जे इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीसाठी अर्ज सादर करण्यास इच्छुक असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत.
इंजिनीयर पदाच्या तब्बल 690 रिक्त जागा भरण्याकरिता इच्छुक पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/ या वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज सादर करा. सदर भरतीसाठी अर्ज सादर करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
बृहन्मुंबई महानगर पालिका अभियंता भरती | BMC City Engineer Recruitment 2024
विभाग | बृहन्मुंबई महानगरपालिका |
---|---|
पद | कनिष्ठ अभियंता |
पद संख्या | 690 |
शिक्षण | डिप्लोमा पदवी |
लेख प्रकार | BMC Jobs |
वय | 18-38 वर्ष |
ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी प्रकार | सरकारी |
अंतिम तारीख | 26 डिसेंबर 2024 |
वेबसाईट | https://portal.mcgm.gov.in/ |
शैक्षणिक पात्रता: Qualification
पदानुसार संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करण्यास पात्र आहे.
पद | शिक्षण |
---|---|
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | इंजिनिअरिंग डिप्लोमा |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | इंजिनिअरिंग डिप्लोमा |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | इंजिनिअरिंग पदवी |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | इंजिनिअरिंग पदवी |
रिक्त जागा l BMC JE Vacancy 2024
पद | संख्या |
---|---|
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 250 |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | 130 |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 233 |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) | 77 |
एकूण | 690 जागा |
वयोमर्यादा | Age Limit
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे. अराखीव प्रवर्गासाठी अधिकतम वय 38 वर्ष आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क | Application Fee
ऑनलाइन अर्ज सादर करत असताना उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
मह्त्वाच्या तारखा | BMC Junior Engineer Exam Date
ऑनलाइन अर्ज प्रक्रियाला 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात झाली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
निवड प्रक्रिया l Selection Process
उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. भरतीची सविस्तर जाहिरात ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा l How To Apply For BMC JE SE Recruitment 2024
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/ वर जावे.
- आता नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
- स्वतःची वैयक्तिक माहिती टाकून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
- नोंदणी क्रमांक व पासवर्ड चा उपयोग करून उमेदवारांनी लॉगिन करून घ्यावे.
- आता ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा.
- अर्जामध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- आता अर्ज सबमिट करावा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढून घ्या.
अधिकृत वेबसाईट लिंक
वेबसाईट | https://portal.mcgm.gov.in/ |
ऑनलाईन अर्ज | ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/ |
जाहिरात | क्लिक करा |